निलेश कासट : पालघर
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे संचलित पालघर जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत पालघर जिल्हाध्यक्षपदी श्री. संदिप रावते यांची तर जिल्हा सचिवपदी श्री. सुभाष झिरवाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण विषयाच्या प्रगतीसाठी आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्यभर महासंघाच्या माध्यमातून कार्य सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून विविध जिल्ह्यांमध्ये कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत पालघर जिल्ह्याची निवड सभा नुकतीच पार पडली.
ही निवड प्रक्रिया जिल्हा मार्गदर्शक श्री. जितेश भोये, श्री. निलेश गायकवाड, श्री. पांडुरंग भरसट, श्री. घनश्याम परिचारक तसेच महासंघाचे संस्थापक श्री. संदीप मनोरे आणि राज्य सचिव प्रा. तायाप्पा शेंडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
नूतन जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून श्री. संदिप रावते यांची निवड करण्यात आली असून, जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. दीपक भुसारा व श्रीमती वर्षा धोडी, कार्याध्यक्षपदी श्री. आलेश हाडळ, जिल्हा सचिवपदी श्री. सुभाष झिरवाळ, सहसचिवपदी श्री. सुजित वाघात व श्री. सागर घायाळ, तर खजिनदारपदी श्री. विनीत माहला यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा संघटकपदी श्री. संदिप निखळे, श्री. मगन चौधरी, श्री. प्रकाश रायात, श्री. रविंद्र गिंभल आणि श्री. निलेश कांटेला यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्हा सदस्य म्हणून कु. सविता घाटाल, श्री. संदिप पालवा, श्री. निलेश रावत्या, श्री. दीपक पवार, श्री. विजय डावरे, श्री. शंकर चौधरी, श्री. अविनाश भुसारा, श्री. योगेश धिंडे, श्री. महेश कामडी, श्री. ईश्वर हडबाल, श्री. सुरेश उंबरसाडा, श्री. नितीन टोकरे, श्री. अनिल बोलाडा, श्री. गणपत कोम आणि श्रीमती प्रमिला बोबा यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी श्री. सुधाकर बेलकर यांची तर जिल्हा प्रसिद्धी सचिवपदी श्री. सचिन गिंभल आणि श्री. विष्णू फडवले यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे यांच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्हे व तालुक्यांमध्ये कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरू असून, पालघर जिल्ह्याची कार्यकारिणी निवड यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. निवड झालेल्या नूतन कार्यकारिणीचे जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण शिक्षक, क्रीडा शिक्षक तसेच क्रीडाप्रेमी नागरिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.













Leave a Reply