टिटवाळा, प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे भारतीय जनता पक्षाचे टिटवाळा प्रभाग क्रमांक ३ (ड) चे नगरसेवक स. मा. श्री. संतोष (आप्पा) तरे यांच्या पुढाकाराने रविवारी (दि. ५ जुलै २०२६) त्यांच्या कार्यालयात ‘देवाभाऊ चष्मा – ध्येय विकसित भारत २०४७’ अंतर्गत मोफत चष्मा वाटप तसेच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभरात सुमारे ३०० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर २०० हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) सन्माननीय ढगे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारची सुट्टी आणि दिवसभर सुरू असलेला मुसळधार पाऊस असूनही मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला भाजप टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, नगरसेविका उपेक्षा भोईर, सोनल मुंढे, लावण्या कांबळे, राणी भोईर, अॅड. सागर वाकले, किरण रोठे, दीपेश तरे, अमित तरे, जगदीश वाघमारे, भाजप युवा मोर्चाचे गिरीश भोय, अनिरुद्ध राणे, स्वप्नील पठारे, योगेश जोशी, विलास वारघडे, घोलप सर, चंद्रकांत जाधव, दीपक कांबळे, अमोल केदार, राहील खिस्मतराव तसेच आंबिवली-मोहोणे परिसरातील भाजप पदाधिकारी शशिकांत पाटील, अनंता पाटील, चंद्रकांत पाटील, अमर पाटील यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
शिबिराचे नियोजन व्हिजन फ्रेंडचे साकीब गोरे, रेड स्वस्तिक सोसायटीचे प्रमोद नांदगावकर आणि निरामय हॉस्पिटलचे स्वामी यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे शिबिर सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी नगरसेवक संतोष (आप्पा) तरे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत, मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतल्याबद्दल सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजोपयोगी उपक्रमांद्वारे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा सेवा भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.












Leave a Reply