म्हारळ येथे  ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम करताना शॉक लागून युवकाचा मृत्यू

टिटवाळा  : उल्हासनगरजवळील म्हारळ येथे ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून दीपक विष्णू शेळके (वय ३४, रा. म्हारळ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हारळ परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मरवरील काम सुरू असताना दीपक शेळके यांना विजेचा धक्का बसला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अपमृत्यू नोंद (ADR क्रमांक १२७/२०२६) करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. मृतदेह उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयातून तपासणीसाठी नेण्यात आला . प्राथमिक माहितीनुसार, दीपक शेळके हे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी वीज दुरुस्तीच्या कामात मदत करत होते.
दरम्यान, या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलिसांकडून अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *